बिडकीन, (प्रतिनिधी) : एकता विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला महाविद्यालय, बिडकीन येथे महिलांची सुरक्षा व सन्मान या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत महिलांचे अधिकार, लैंगिक छळास प्रतिबंध आणि तक्रार निवारणाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एमजीएम विद्यापीठाच्या शिक्षण विभागातील सहाय्यक प्रा. डॉ. अनिता फुलवाड प्रमुख मार्गदर्शक होत्या.
अध्यक्षस्थानी डॉ. रामकिसन मुंडे होते. डॉ. अर्चना काटकर, डॉ. मुखत्यार शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. फुलवाडे यांनी महिलांच्या सुरक्षिततेचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थिनींनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहावे,
अन्याय किंवा छळाच्या प्रसंगी आवाज उठवावा आणि उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणेचा योग्य वापर करावा, असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. मुंडे यांनी डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर करताना विद्यार्थी विद्यार्थिनींनी सावधगिरी आवाहन केले बाळगण्याचे सूत्रसंचालन डॉ. अंजली काळे यांनी केले.













